Now or Never अभी नहीं तो कभी नहीं
*Now or Never*
*अभी नही तो कभी नही*
*अभी नही तो कभी नही*
*20 सप्टेंबर19 ला जगभरातील लहान मुले रस्त्यावर उतरत आहेत एका निदर्शनासाठी !*
*अशीच ती उतरली होती 15 मार्चला ...तब्बल 16 लाख मुले !!*
*7 खंडांमधील 125 देशातील 2000 शहरांमधून...!!!*
*20 सप्टेंबरला कदाचित 50 लाख किंवा 1 कोटीच्या पुढे...*
ह्या अभियानाचे नाव आहे...*FFF Protest (Friday for Future Protest)*. ही मुले दर शुक्रवारी शाळेला जातात पण शाळेत बसत नाहीत. तर रस्त्यावर, शहराच्या टाऊन हॉलसमोर, सरकारी ऑफिससमोर, संसदेसमोर, आमदार-खासदार-नगरसेवक यांच्या घरासमोर बसतात...हातात फलक घेऊन...मूकपणे...शांतपणे !
त्यांचे म्हणणे आहे
*1)आम्ही शाळेत कशासाठी जाऊ जर शाळेतून बाहेर पडताना पृथ्वीवरील जीवसृष्टी संपली असेल तर...?*(2030 साल हे शास्त्रज्ञांनी सीमारेषा डेडलाईन म्हणून जाहीर केले आहे)
*2)आम्ही शिकून काय फायदा?* कारण खूप शिकलेल्या-प्रचंड संशोधन करणाऱ्या महान शास्त्रज्ञांचं जर तुम्ही ऐकत नसाल तर आमच्या शिकण्याचा काय फायदा?

गेली 40 वर्षे शास्त्रज्ञ जागतिक हवामानबदलाचे भीषण दुष्परिणाम याबाबतचे वेगवेगळे रिपोर्ट देत आहेत. सर्व देशांच्या सरकारांनी तातडीने उपाय करण्यासाठी विनवत आहेत. सर्व देशांची सरकारे पॅरिस करारासारख्या करारांवर केवळ सही करून प्रत्यक्षात काहीही उपाय करत नाहीत. एवढेच नव्हे तर निसर्गाच्या झालेल्या नुकसानीची खरी आकडेवारी लपवत आहेत.
*"You are stealing our dreams and future तुम्ही आमचे भविष्य आणि स्वप्ने नष्ट करत आहात"* असा मूक आक्रोश करत ही चिमुकली मुले रस्त्यावर उतरली आहेत. जणू ही म्हणत आहेत "तुम्ही मोठे लोक काहीच करत नसल्याने आता आम्हाला रस्त्यावर यावे लागत आहे"
याबद्दल अधिक माहिती मिळेल खालील लिंकवर...
https://www.fridaysforfuture.org/
https://www.fridaysforfuture.org/
जगभरातील 455 शास्त्रज्ञांनी सर्व देशांच्या विविध सरकारी व इतर शास्त्रीय अभ्यासगट यांच्या 1500 रिपोर्ट्सचा निष्कर्ष काढला आहे...3 वर्षे प्रचंड मेहनत घेऊन ! पृथ्वीवरील जीवसृष्टीवर मानवी विकासाचा झालेला आघात इतका खोलवर व विस्तृतपणे पहिल्यांदा अभ्यासला गेला आहे. हा अहवाल युनो(UN) ने Intergovernmental Science-Policy Platform on Biodiversity and Ecosystem Services (IPBES) च्या परिषदेत 4 मे 2019 रोजी जाहीर केला आहे. ह्या रिपोर्टनुसार पृथ्वीवरील 10 लाख प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
युनो रिपोर्ट ची लिंक-
https://www.un.org/sustainabledevelopment/blog/2019/05/nature-decline-unprecedented-report/
https://www.un.org/sustainabledevelopment/blog/2019/05/nature-decline-unprecedented-report/
केवळ 8 वर्षांपूर्वी, प्रजाती नष्ट होण्याचा वेग होता वर्षाला 5000 प्रजाती ! (अधिक माहितीसाठी वाचा पुस्तक 'थैमान चंगळवादाचे'- लेखक- अच्युत गोडबोले)
*आता दररोज 200 हून अधिक प्रजाती (वर्षाला अंदाजे 1 लाख प्रजाती) नष्ट होत आहेत. एक प्रजाती नष्ट होणे म्हणजे जैविक अन्न साखळीतील एक दुवा नष्ट होणे...ज्यामुळे ती पूर्ण साखळीच नष्ट होते. लाखो वर्षात तयार झालेली एक प्रजाती पृथ्वीवरून पुर्णतः नाहीशी होणे. हे भयंकर आहे. फक्त आपल्या डोळ्यासमोर सर्व घडत नसल्याने आपल्याला त्याची जाणीव होत नाही.*
https://www.theguardian.com/environment/2019/may/06/human-society-under-urgent-threat-loss-earth-natural-life-un-report
https://www.theguardian.com/environment/2019/may/06/human-society-under-urgent-threat-loss-earth-natural-life-un-report
विकासाच्या नावाखाली चालू असलेल्या अनेक भयंकर गोष्टी हा विध्वंस घडवत आहेत. जगभरातील शास्त्रज्ञांनी अभ्यासाअंती 2 धोक्याच्या सूचना दिल्या आहेत.
*1) पृथ्वीचे तापमान औद्योगिक युगाच्या आधीच्या तापमानापेक्षा फक्त 2 डिग्री सेंटिग्रेडने वाढले तर मानवासाहित पूर्ण जीवसृष्टी नष्ट होईल.* (उन्हाळ्यात आपल्या गावातले तापमान 7/8 डिग्रीने वाढणे ही वेगळी गोष्ट आहे. ते दिवसा तापून रात्री थंड होते. 70% समुद्राने- पाण्याने व्यापलेल्या पृथ्वीचे तापमान वाढणे ही वेगळी गोष्ट आहे. त्याचे होणारे परिणाम खूप वेगवेगळे आहेत. शेकडो मैल लांब-रुंद व 2 किलोमीटर खोली/जाडी असलेले बर्फखंड वितळणे ह्यापासून ते वादळे-प्रलय-दुष्काळ असे मानवी जीवन उध्वस्त करणारे अनेक परिणाम त्यामुळे घडू शकतात. ही अवस्था वेगाने जवळ येत आहे. केदारनाथ-काश्मीर-केरळ प्रलयाच्या आठवणी आपण जर विसरलो असू तर पुढचा नंबर आपलाच आहे.)

*2) हवामानबदलाचा व प्रजाती नष्ट होण्याचा वेग असाच चालू राहिला तर 2030 सालाच्या आसपास विनाशाची अशी चेन रिऍक्शन निसर्गात सुरू होईल की ती थांबवणे मानवाला शक्य नाही.*
या विनाशामागची प्रमुख कारणे आहेत--
1) ग्लोबल वार्मिंग व हरीतवायूंचे उत्सर्जन- प्रमुख कारण- जिवाष्म इंधन (पेट्रोलियम ज्वलन, विजेची गरज भागविण्यासाठी कोळसा ज्वलन )
2) वाढत्या मांसाहाराच्या पूर्ततेसाठी *दर मिनिटाला 150 एकर जंगल* कापून तिथे animal farming केले जात आहे.
3) समुद्रातील प्रचंड मासेमारी व समुद्रातील आम्लता वाढणे sea acidification
4) रासायनिक खते व विषारी कीटकनाशकांचा वाढता वापर...
जल-जमीन-वायू यातील प्रदूषण धोकादायक बनले आहे. भारतात 2018 साली वायुप्रदूषणामुळे 15 लाख लोक मृत्यू पावले.
[ संयुक्त राष्ट्रे -युनो व IPCC (Intergovernmental Panel for Climate Change) यांच्या रिपोर्ट्स चा विस्तृत अभ्यास आपण खालील लिंकवर जाऊन करू शकता.

*काय होणार या मुलांच्या आंदोलनाने?*
खरच असे वाटणे साहजिक आहे. हे आंदोलन सुरू करणारी ग्रेटा थनबर्ग Greta Thunberg ही केवळ 15 वर्षांची मुलगी! शाळेत याबाबतचा व्हिडीओ आठव्या वर्षी पहिल्यावर अस्वस्थ झालेली ! आपल्या घरी कागद वाचवा-वीज वाचवा-झाडे लावा असे उपाय ती करू लागली. याची अधिक माहिती घेऊ लागली-- तिला लक्षात आले हे उपाय फुटकळ आहेत--एवढा विनाश घडत असताना मीडिया-राजकारणी-उद्योगपती काहीच करत नाहीत या दुःखाने ती 11 व्या वर्षी निराशेच्या गर्तेत गेली...depression...त्यातून हळूहळू सावरली...कोणीच काही करत नाही म्हणून वयाच्या 15व्या वर्षी 20 ऑगस्ट 2018 रोजी स्वीडन देशाच्या संसदेसमोर जाऊन निषेधाचा फलक घेऊन सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत बसली. सर्व म्हणाले- याने काय होणार? 3 आठवडे बसली. हळूहळू लोक जमा व्हायला लागले. नंतर दर शुक्रवारी शाळा सोडून बसू लागली. *अनेक देशांतील मुले आंदोलनात सहभागी झाली...आठच महिन्यांत तब्बल 16 लाख मुले !!* पर्यावरणासाठी काम करणाऱ्या शेकडो संस्था, सर्व शास्त्रज्ञ ह्या मुलीच्या पाठीशी उभे राहिले. जणू सर्वांनी तिला नेतृत्व बहाल केलं. युनो च्या सभेत तिला बोलायला आमंत्रित केलं गेलं. मग जागतिक आर्थिक परिषद- दाओस, नंतर युरोपियन युनियनची शिखर परिषद...आणि 23 एप्रिलला इंग्लंड संसदेसमोर! या चारही सभेत जगातील अनेक मान्यवर तिचं बोलणं ऐकत होते. *दररोज 200 प्रजाती नष्ट होत आहेत हे सांगताना तिला दुःख अनावर होते...ती म्हणते "तुम्ही आमचं भविष्य मूठभर धनदांडग्यांना विकलंय. मला तुमचं कौतुक नको, पुरस्कार नकोत, तुमची ठोस कृती हवीय. तुम्ही आशावादी आहात हे पुरेसं नाहीये. तुम्ही घाबरून जायला हवं ही माझी इच्छा आहे. जीवसृष्टी नष्ट होण्याकडे वेगाने सरकतेय या वास्तवाने तुम्ही घाबरून तातडीने उपाययोजना करायला हव्यात."*
हे उपाय प्रत्यक्षात येण्यासाठी दर शुक्रवारचे आंदोलन सुरू आहेच. सततच्या आंदोलनामुळे जगातल्या सर्वात जुन्या लोकशाही देशाने-इंग्लंडने तिच्या भाषणानंतर आठ दिवस विचारविमर्ष करून *राष्ट्रीय पर्यावरणीय आणीबाणी National Environmental Emergency* 1मे 2019 रोजी जाहीर केली. पाठोपाठ स्कॉटलंडने ही पर्यावरणीय आणीबाणी जाहीर केली.
*आता जगभरातील सर्व देशांनी तातडीने कृती करावी यासाठी आंदोलन वाढते राहणे गरजेचे आहे...ही आपलीच गरज आहे.*
*पर्यावरणास अग्रक्रम देणारे नेते ऐतिहासिक हिरो बनतील आणि याला महत्त्व न देणारे ऐतिहासिक व्हिलन !*
लक्षात असू द्या. भारतातील निवडणूक संपली आहे. *सर्व पक्षाच्या सर्व भक्तांनी आता फक्त धरणीमातेचे ऋण फेडण्यासाठी या निदर्शनात सहभागी होणे गरजेचे आहे.* कोणत्याही पक्षाचे सरकार सत्तेत येवो...अगदी तुमच्या आवडत्या पक्षाचे वा आवडत्या नेत्याचे सरकार जरी स्थापन झाले तरी आपण सर्व जनता एक होऊया...जीडीपीच्या भ्रामक मॉडेल मधून सत्ताधाऱ्यांना मुक्त करूया...हॅप्पीनेस इंडेक्स आणि पर्यावरणपूरक शाश्वत विकासाचे नवीन मॉडेल तयार करण्याची विनंती करूया...
*सत्तेतील राजकारण्यांवर एक दबाव आहे 5 वर्षात जीडीपी ग्रोथ दाखवण्याचा! उद्योगपती काही करण्याची शक्यता कमी, कारण त्यांचे हजारो कोटी प्रदूषण वाढवणाऱ्या उद्योगात अडकले आहेत. त्यामुळे जनसामान्यांचा दबाव निर्माण झाला तरच सिस्टीममध्ये आमूलाग्र बदल घडू शकतात.*
*जिकडे जायचे आहे त्याविरुद्ध दिशेला मी जात आहे हे कळल्यावर तातडीने ब्रेक लावून, थोडे रिव्हर्स येऊन दिशाच बदलणे गरजेचे आहे. दिशा बदलणे सोडाच--कोणतेही देश ब्रेक लावायला देखील तयार नाहीत हे खरे दुःख आहे, दुर्दैव आहे.*

*कदाचित ही मुले आपल्यालाच म्हणत आहेत "तुम्ही षंढासारखे निष्क्रिय आहात...मश्गूल आहात राजकारण-क्रिकेट-बॉलिवूडमध्ये...आतातरी जागे व्हा...उठा...स्वतः काही उपाय केले नाही तर आता आम्हाला तरी पूर्ण ताकदीने पाठिंबा द्या...उतरा आमच्यासोबत रस्त्यावर...जोपर्यंत बदल घडलेला दिसत नाही तोपर्यंत, आश्वासने खूप झालीत आजवर...आम्ही शाळा बंद आंदोलन सुरू केलंय दर शुक्रवारी...आम्हाला जन्म दिलाय तर आमच्यासाठी एवढं तरी कराच...*
*आमच्यासाठी...सुंदर फुलपाखरांसाठी...सुंदर फुलांसाठी...सुंदर प्राणी-कीटक-वनस्पती-झाडांसाठी आणि सुंदर जलचरांसाठी...ह्या अनोख्या जीवसृष्टीसाठी...नाहीतर...नाहीतर वेळ उलटून गेल्यावर काही करूनदेखील उपयोग नाही.*

या मुलांचे खालील व्हिडीओ अवश्य बघा...
General guidelines to strike in your city- आपल्या शहरात FFF सुरू करण्यासाठी अधिक माहितीसाठी-
https://www.fridaysforfuture.org/
https://www.fridaysforfuture.org/
यात सहभागी होण्यासाठी
https://www.fridaysforfuture.org/join
*ह्या लिंकवर जरूर आपले नाव नोंदवा ज्यामुळे सहभागी लोकांचा खरा आकडा जगाला कळेल. इतरांना प्रेरणा मिळेल.*
https://www.fridaysforfuture.org/join
*ह्या लिंकवर जरूर आपले नाव नोंदवा ज्यामुळे सहभागी लोकांचा खरा आकडा जगाला कळेल. इतरांना प्रेरणा मिळेल.*
दर शुक्रवारी/महिन्याच्या एका शुक्रवारी 1 तास देऊयाच...निदान एवढं तरी करूया.*
जवळच्या शाळांत माहिती द्यावी. आपल्या भागातील जैवविविधता टिकविण्यासाठी समविचारी लोकांचा गट बनवून काम सुरू करावे. आम्हाला संपर्क करू शकता. नागरिक म्हणून आपण प्रत्येकजण आपला कार्बन फूटप्रिंट कमी करूया...आपण आपल्या घरात ओला व सुका कचरा वेगळा करणे ही सुद्धा निसर्ग वाचवण्यात मोलाची मदत आहे.
(ही पोस्ट लिहून संपताना भाजप 248 जागांवर आघाडीवर आहे. मा. मोदी संवेदनशील आहेत. *सलग 10000 वर्षे टिकून असलेल्या भारतीय संस्कृतीकडे पर्यावरणपूरक अर्थव्यवस्थेचा अनुभव आहे. ह्याचे ज्ञान पुनरुज्जीवित होईल. आशा आहे की नवीन पर्यावरणपूरक शाश्वत विकासाचे मॉडेल (Ecofriendly Sustainable Development Model) निर्माण करून ह्याबाबतीतदेखील मोदी भारतास जगाचे रोल मॉडेल बनवतील.*)
-नितीन डोईफोडे
9561933771
missionavani@gmail.com
(जनजागृतीसाठी हा मजकूर माझ्या किंवा आपल्या नावाने छापून, पत्रके शेजारी,शाळा,ऑफिस, मॉल-दुकानांमधून प्रत्येकास वाटण्यास माझी हरकत नाही. आपल्या नावाने सोशल मीडियात फॉरवर्ड करण्यासही हरकत नाही. जनजागृती होणे महत्त्वाचे !)
23 मे 2019

*Now or Never !*
*अभी नही तो कभी नही !!*
*अभी नही तो कभी नही !!*
Comments
Post a Comment